परतावा धोरण
PDF किंवा ई-पुस्तक एकदा मिळाले की परत करता येत नाही, म्हणून वितरणानंतर आम्ही परतावा देत नाही. आमच्या बाजूने काही बिघडले तर आम्ही दुरुस्त करतो किंवा पैसे परत करतो.
वितरित फाइलवर परतावा नाही
डिजिटल फाइल परत करता येत नाही. डाउनलोड तुम्हाला मिळाल्यावर विक्री अंतिम होते. कृपया खरेदीपूर्वी प्रॉडक्ट पानावरील वर्णन आणि नमुना पाने वाचा.
आम्ही कधी मदत करतो
पैसे कापले पण डाउनलोड मिळाला नाही, एकाच PDF साठी दोनदा पैसे भरले गेले, किंवा फाइल उघडत नाही, तर 7 दिवसांत आम्हाला लिहा. या तिन्ही गोष्टी आम्ही आमच्या नोंदी पाहून आणि फाइल तपासून स्वतः पडताळू शकतो. आम्ही योग्य फाइल पाठवू, आणि जमले नाही तर पूर्ण पैसे परत करू.
कसे कळवायचे
ज्या ईमेलवरून खरेदी केली तिथून [email protected] वर लिहा. ईमेल दिला नसेल तर ऑर्डर क्रमांक किंवा Razorpay पेमेंट ID सांगा. आम्ही काही कामकाजाच्या दिवसांत उत्तर देतो.
पैसे कसे परत येतात
मंजूर परतावा Razorpay मार्फत तुम्ही ज्या UPI अॅप, कार्ड किंवा बँक खात्यातून पैसे भरले त्यातच जातो. तुमच्या बँकेनुसार तो सहसा 5 ते 7 कामकाजाच्या दिवसांत पोहोचतो. परतावा झाला की डाउनलोड लिंक बंद होते.
मोफत टूल्सवर परिणाम नाही
कन्व्हर्टर, टायपिंग ट्यूटर आणि छापायचे चार्ट मोफतच राहतात. हे धोरण फक्त स्टोअरमधून घेतलेल्या PDF आणि ई-पुस्तकांसाठी आहे.